जैस्वालने केलेल्या 712 धावा ही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यादरम्यान त्याने दोन द्विशतके आणि तीन अर्धशतके झळकावून भारताला 4-1 ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने राजकोटमध्ये द्विशतक करताना 12 षटकार मारून कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाल्यानंतर जयस्वाल म्हणाले, आयसीसी पुरस्कार मिळाल्याने मला खरोखर आनंद झाला आहे आणि मला आशा आहे की मला भविष्यात आणखी पुरस्कार मिळतीलमाझ्यासाठी आणि पाच सामन्यांच्या पहिल्या मालिकेसाठी ही सर्वोत्तम होती. मला खूप मजा आली. मी चांगला खेळ केला आणि आम्ही मालिका 4-1 ने जिंकण्यात यशस्वी झालो. माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत माझ्यासाठी हा एक अविश्वसनीय अनुभव आहे.”