भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुलीप ट्रॉफी फेरीच्या सामन्यांमध्ये बदल केले आहेत. याआधी अनंतपूर येथे आयोजन करण्यात येणार होते, मात्र आता ते बंगळुरूमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व्यतिरिक्त भारताचे आणखी काही स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
भारताला बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये आणि 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. रोहित आणि विराट खेळण्याचा निर्णय स्वतः घेतील पण रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव यांना त्यात खेळण्याची अपेक्षा आहे.बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी बुमराह आणि अश्विन थेट संघात सामील होतील.