फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथ अग्रस्थानी असून इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे दोघे त्यापाठोपाठ दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या रवींद्र जडेजाने अग्रस्थान कायम राखले असून रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जडेजा व अश्विन यांनी अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकन यादीतही पहिल्या पाचात स्थान राखले असून जडेजा दुसऱ्या, तर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगला देशच्या शकिब अल हसनने अष्टपैलूंमधील अग्रस्थान कायम राखले आहे. शकिबने नुकताच बांगला देशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलावहिला कसोटी विजय मिळवून दिला. विंडीजला इंग्लंडवर विजय मिळवून देणाऱ्या क्रेग ब्रेथवेट आणि शाई होप यांनी फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 16 व 42वे स्थान मिळविले आहे. शाई होपने या सामन्यातील दोन्ही डावांत शतके झळकावली होती.