T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक बदलणार! द्रविडचा करार जूनमध्ये सह संपुष्टात येणार

शुक्रवार, 10 मे 2024 (19:36 IST)
T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकात मोठा बदल होऊ शकतो. वास्तविक, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर वाढवण्यात आला होता. नोव्हेंबर 2021 पासून ते टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आहेत. मात्र, आता बोर्ड लवकरच नव्या प्रशिक्षकाची जाहिरात देणार असल्याची बातमी समोर आली आहे. द्रविडचा करार जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 सह संपुष्टात येणार आहे.
 
द्रविडची इच्छा असल्यास, ते या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला."राहुलचा कार्यकाळ फक्त जूनपर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना अर्ज करायचा असेल तर ते तसे करण्यास मोकळे आहेत," असे ते म्हणाले.
 
शहा यांनी परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची शक्यताही फेटाळून लावली आहे. शाह पुढे म्हणाले, "नवा प्रशिक्षक भारतीय असेल की परदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही. ते CAC वर अवलंबून असेल आणि आम्ही एक जागतिक संस्था आहोत."
 
आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा समावेश करण्यात आला आहे. केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे.
 
1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तर अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
 
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ:  रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
 
राखीव :  शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.
 
Edited By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती