T20 World Cup 2024: टीम इंडियाचा मोठा गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर!

मंगळवार, 12 मार्च 2024 (09:36 IST)
T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाणार आहे .भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या शमीच्या घोट्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या बरे होण्यासाठी बराच वेळ जाणार आहे.शमी आता सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेदरम्यानच पुनरागमन करू शकतो. वृत्तसंस्थेने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 
 
शमीच्या घोट्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून तो आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा सुरू झाली. आता खुद्द बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. जय शाह यांनी पीटीआयला खुलासा केला आहे की मोहम्मद सामी आगामी T20 विश्वचषक खेळू शकणार नाही आणि वर्षाच्या अखेरीसच पुनरागमन करू शकेल. 
 
जय शाह यांनी पीटीआयला सांगितले की, शमीवर शस्त्रक्रिया झाली असून तो भारतात परतला आहे. शमी बांगलादेशविरुद्धच्या मायदेशी मालिकेत परतण्याची शक्यता आहे. केएल राहुलला इंजेक्शन्सची गरज आहे, त्याने पुनर्वसन सुरू केले आहे आणि तो एनसीएमध्ये आहे. 
 
बांगलादेशचा संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. येथे 2 कसोटी सामने आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दरम्यान, मोहम्मद शमीला तंदुरुस्त होण्यासाठी जवळपास 6 महिने लागणार आहेत. 
 
गेल्या वर्षी, शमीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतल्या आणि तो स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरला.एकदिवसीय विश्वचषकातही त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आता त्याची T20 विश्वचषकात अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का ठरू शकते.

Edited By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती