T20 WC: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोहित शर्माच्या T20 कर्णधारपदाचा निर्णय !

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (20:25 IST)
ICC T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला.भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र टीम इंडिया 10 विकेट्सने पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली होती.या सामन्यापासून कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार दोन्ही बदलण्याची गरज असल्याचंही हरभजन सिंगने म्हटलं आहे.T20 विश्वचषक 2022 नंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जात आहे, जिथे हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे आणि रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.या मालिकेनंतर भारताच्या T20 कर्णधारपदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वृत्त समजले आहे.
 
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने  सांगितले की, “या पराभवानंतर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.तो दारुण पराभव होता.आम्ही चांगली तयारी केली होती, आधी संघ ऑस्ट्रेलियाला पाठवला. आयसीसी विश्वचषक 2023 वर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे मानले जात आहे.अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला जास्तीत जास्त टी-20 मालिकेत भारताची धुरा सांभाळण्याची संधी मिळू शकते
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती