आयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि दबावाच्या परिस्थितीतही आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेतो. तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकेल, यात जराही शंका नाही.
प्रतिभेला जेव्हा संधी मिळते, तेव्हा काय होऊ शकते याचे कर्णधार म्हणून पंत उत्तम उदाहरण आहे, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले.
पंतने या संधीचे सोने केले. त्याच्या नेतृत्वात दिल्लीला 8 पैकी 6 सामने जिंकण्यात यश आले होते. सध्या आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित झाला, त्यावेळी दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर होता. पंतने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीने भारताचे महान क्रिकेटपटू गावसकर प्रभावित झाले. भविष्यात पंत भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकेल, असे मत गावसकरांनी बोलताना व्यक्त केले.