शशांक मनोहर यांचा ICC अध्यक्षपदाचा राजीनामा

गुरूवार, 2 जुलै 2020 (08:25 IST)
ICC चे माळवते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर अखेर बुधवारी ICC चे अध्यक्षपद सोडले.नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत ICC उपाध्यक्ष असलेले इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी म्हणून परिषदेचा कारभार सांभाळतील. “ICC बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मी शशांक मनोहर यांचे नेतृत्व आणि त्यांनी ICC चे अध्यक्ष म्हणून खेळासाठी दिलेले योगदान यासाठी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो”, अशा शब्दात ICC चे मुख्य कार्यकारी मनु सावनीने यांनी शशांक मनोहर यांचे आभार मानले.
 
२०१६ मध्ये शशांक मनोहर हे ICC अध्यक्षपदी निवड झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले. ६२ वर्षीय शशांक मनोहर हे २००८ ते २०११ या काळात BCCI चे प्रमुख होते. शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते. मात्र करोनामुळे ICC च्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती