सचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह

शनिवार, 27 मार्च 2021 (11:18 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला करोनाची लागण झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिनने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 
 
सचिनने ट्विट करत म्हटले की मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची रिर्पोट असून मी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. मी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहे.
 
सचिनने आपल्या पोस्टमध्ये माइल्ड लक्षण असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की मी करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज रिर्पोट पॉझिटिव्ह आली आहे. घरातील इतरांचे रिर्पोट निगेटिव्ह असल्याचे ‍सचिनने सांगितले. 
 
सचिनने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. त्यांनी देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे आभार मानले आहेत. सचिन तेंडुलकर भारत सरकारच्या करोनासंदर्भातील जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाला होता.

नुकताच सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती