पृथ्वीची काळजी घेऊन ती चांगल्या अवस्थेत पुढच्या पिढीपर्यत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे, असे तो म्हणाला. भारतातल्या सर्व गाड्या 2030 पर्यत इलेक्ट्रि कार करण्याचे केंद्र सरकाराचे उद्धिष्ट आहे. सरकारचा हा प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याचे तो म्हणाला. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन व्यवस्थेबाबातचे आपले मत तो मांडत होता. आपल्या 8 हायब्रीड या इलेक्ट्रिक गाडीचा अनुभव सुखद असल्याचेही त्याने सांगितले.