दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ जाहीर झाला आहे. यासह रोहित शर्माकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय नंतर त्याला टीम इंडियाचा नवा एकदिवसीय कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. अखिल भारतीय निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्यात आले.