आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला

शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (10:08 IST)
भारतीय फिरकीपटू आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताला पहिले यश मिळवून देत त्याने मोठी कामगिरी केली आहे. आता अश्विन हा माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताला अडचणीत आणले होते, ज्याला फोडण्याचे काम अश्विनने केले. अश्विनने जॅक क्रॉलीला (15) रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. 
यासह अश्विन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर 500 कसोटी बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 
 
कसोटीत सर्वाधिक विकेट्स 
800-मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
708 शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
619 अनिल कुंबळे (भारत)
517 नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)
500- रविचंद्रन अश्विन (भारत)
 
भारतीयांकडून सर्वाधिक कसोटी बळी
619-अनिल कुंबळे
500- आर अश्विन
434-कपिल देव
417- हरभजन सिंग
311- इशांत शर्मा

Edited By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती