IPL 2019: मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन

रविवार, 12 मे 2019 (23:44 IST)
IPL च्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला 1 धावेने पराभूत केले. मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. हा अंतिम सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यत रंगला होता.
 
IPL चा अंतिम सामना मुंबई आणि चेन्नई या दोन संघांमध्ये हैदराबादच्या मैदानावर झाला असून मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवला होता.
 
चेन्नईचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस २६ धावांवर बाद झाला. सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. राहुल चहरने सुरेश रैनाची विकेट घेतली. सुरेश रैनाने 14 बॉलमध्ये 8 धावा केल्या. 
 
रायुडूच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रायुडूला एका धावेवर समाधान मानावे लागले. 11 व्या ओव्हरमध्ये बुमराहने अंबाती रायडूला तंबूत पाठवलं.
 
चेन्नईच्या चाहत्यांना तेव्हा धक्का बसला जेव्हा धोनी दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यावेळी दुसरी धाव घेतना इशान किशनने नॉन स्ट्राइक येथे असलेल्या स्टम्पवर थेट चेंडू मारला. तिसऱ्या 
 
पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आला होता. तिसऱ्या पंचांनी धोनीला आऊट दिले.
 
शेन वॉटसनचे अर्धशतक झाल्यानंतर चेन्नईला पाचवा धक्का ब्राव्होच्या रुपात बसला. 
 
मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 41 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 29 धावा केल्या. तर ईशान किशनने 23 धावा केल्या.
 
कॅप्टन रोहित शर्माने 15 तर हार्दिक पांड्याने 16 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या 
 
धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
 
दीपक चहरने तीन विकेट तर शार्दुल ठाकूर आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
 
आतापर्यंत सात वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत गेलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला मुंबई इंडियन्सशी होता. दोन्हीही टीमने आतापर्यंत तीन तीन वेळा ही स्पर्धा जिंकली.
 
 2018, 2011 आणि 2010 या तीन वर्षांत चेन्नईने अंतिम सामना जिंकला होता. मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017मध्ये आयपीएलची स्पर्धा जिंकली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती