रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (21:58 IST)
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तेव्हापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
 
तत्कालीन निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं. नंतर ऋषभ पंतची खराब कामगिरी नंतर देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलकडे यष्टीरक्षण दिलं.
 
अशात धोनीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असली तरी धोनीच्या मनात अजून तरी निवृत्तीचा विचार आलेला नाही, असे धोनीच्या एका जवळच्या मित्राने एका खाजगी चॅनलशी बोलताना सांगितले. त्याने म्हटलं की धोनीला रिटारमेंटबद्दल विचारलं की राग येतो कारण त्याच्यामते तो अजुनही सर्वात तंदुरुस्त विकेटकीपर आहे. सध्या तो स्वतःच्या फीटनेसवर खूप लक्ष देत आहे. वय त्याच्या हातात नसलं तरी तो फिट राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
 
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 टी-20 आणि 2011 वन-डे असे दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र मागील वर्षापासून माही फॉर्ममध्ये नाही म्हणतं अनेक माजी खेळाडू तसेच सोशल मीडियावर देखील त्याने निवृत्ती स्विकारावी असा दबाव वाढत चालला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती