गोलंदाज कितीही चांगला असला, तरी सर्वस्वी प्रतिकूल खेळपट्टीवर त्याला कितपत परिणामकारक काम गिरी बजावता येईल हे कधीच सांगता येत नसते. त्यामुळेच भारताच्या दौर्यातील यशाबद्दल स्टार्क आशावादी असला, तरी त्याला खेळपट्टीकडून काही साथ मिळण्याची अपेक्षा कधीच नाही. अस्सल वेगवान गोलंदाजी, तसेच उसळते चेंडू हा भारतीय पलंदाजांचा कच्चा दुआ आहे. त्यामुळे भारतात वेगवान किंवा उसळती खेळपट्टी मिळण्याची मला कधीच अपेक्षा नाही, असे सांगून स्टार्क म्हणाला की, यानंतर आम्हाला मिळणारी खेळपट्टी देणे येथील खेळपट्टीइतकी काटकोनात चेंडू वळविता येईल अशी नसेल किंवा अगदी पहिल्या सत्रापासून ती फुटार नाही. परंतु भारतातील खेळपट्टीवर हिरवळ पाहायला मिळण्याची शक्यता आम्ही कधीच गृहीत धरलेली नाही.