भारत आणि इंग्लंड सामना अनिर्णित राहिला होता. याचदरम्यान पाच फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या कसोटी मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार एम. एस. धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारतीय संघाने प्रत्येकी 9-9 वेळा कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यास कोहली धोनीचा हा विक्रम मोडीत काढेल. घरच्या मैदानावर धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने जिंकले आहेत. तर कोहलीने 20 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत धोनीचा हा विक्रमही मोडीत काढण्याची संधी विराटकडे आहे. धोनीचे दोन्ही विक्रम मोडीत काढल्यास घरच्या मैदानावर सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कोहलीच्या नावावर नवीन विक्रम होईल. सध्या धोनी पहिल्या आणि विराट दुसर्या क्रमांकावर आहेत.