इशान किशनला दुखापत, रुग्णालयात दाखल, डोक्यावर बाउन्सर लागला

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (13:02 IST)
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दुखापत झाली. आता तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याचे खेळणे संशयास्पद आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना लाहिरू कुमाराच्या धोकादायक बाऊन्सरने इशानच्या डोक्याला मार लागला. यानंतर तो जमिनीवर बसला आणि काही काळ खेळ थांबवण्यात आला. मात्र, यानंतर किशनने फलंदाजी केली, मात्र त्याला फार काही करता आले नाही. सामना संपल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
किशनशिवाय श्रीलंकेच्या दिनेश चंडिमललाही रुग्णालयात नेण्यात आले आहे, मात्र त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली असून त्याची प्रकृती पूर्णपणे सामान्य आहे. 
 
इशानने 16 धावांची खेळी खेळली, पहिल्या सामन्यात 89 धावांची शानदार खेळी खेळणारा किशन दुसऱ्या सामन्यात केवळ 16 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने एकूण 15 चेंडू खेळले आणि दोन चौकार मारले. बाद होण्यापूर्वीच किशनच्या डोक्याला मार लागला. किशनला  कांगडा येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती