IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली

रविवार, 26 सप्टेंबर 2021 (17:25 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 35 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्स पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात CSK ने RCB चा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतरही आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात 2 सामने गमावल्याने त्याचा नेट रन रेट प्रभावित झाला आहे. पहिल्या सामन्यात केकेआरकडून आरसीबीचा पराभव झाला. दुसरीकडे, CSK ने , IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करताना आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
 
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर कायम आहे. पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्स सातव्या तर सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलावे तर चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीची शानदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली. विराटने 41 चेंडूत 53 धावा केल्या. पडिक्कलने आरसीबीसाठी 70 धावा केल्या.त्याच्याशिवाय डिव्हिलियर्सने 11, मॅक्सवेलने 11 धावा केल्या.आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने तीन तर शार्दुल ठाकूरने दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. 
 
157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता नाऋतूराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिसने चेन्नईची शानदार सुरुवात केली. दोघांमध्ये 71 धावांची भागीदारी झाली. 157 धावांचे आव्हान चेन्नईने 18.1 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले. CSK कडून ऋतूराज गायकवाडने 38 आणि अंबाती रायुडूने 32 धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने 31 धावा केल्या. सुरेश रैना नाबाद 17 आणि कर्णधार एमएस धोनीने 11 धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने दोन बळी घेतले. ड्वेन ब्राव्होला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच  पुरस्कार देण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती