INDvSL: श्रीलंकेहून मिळालेल्या पराजयानंतर विराट हे म्हणाला!

शुक्रवार, 9 जून 2017 (12:39 IST)
चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये गुरुवारी श्रीलंकेने भारताला सात विकेटने पराभव केले. टीम इंडियाने 322 धावांचे लक्ष्य दिले, ज्याला श्रीलंकाई संघाने 48.4 ओवरमध्ये तीन गडी बाद होऊन पूर्ण केले. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने संकेत दिले आहे की पुढील सामन्यात संघात मुख्य बदल करण्यात येतील. त्याशिवाय त्याने गोलंदाजांचा बचाव करत श्रीलंकेच्या फलदाजांना विजयाचे क्रेडिट दिले.  
 
शिखर धवन (125), रोहित शर्मा (78) आणि महेंद्र सिंह धोनी (63)ने मिळून 50 षटकांमध्ये सहा विकेट गमावून 321 धावा काढल्या. यावर विराट म्हणाला आम्हाला असे वाटत होते की आम्ही फार मोठा स्कोर बनवला आहे. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण फलंदाज (श्रीलंकाई) आले आणि त्यांनी अशी खेळी खेळली की आमच्याजवळ करण्यासाठी जास्त काही उरलेच नव्हते. सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि त्यासाठी पूर्ण क्रेडिट त्यांना दिले पाहिजे.
 
विराट पुढे म्हणाला, मी आधीच सांगितले आहे की ही चँम्पियंस ट्राफी आहे आणि जगातील आठ चॅम्पियन संघाच्या विरुद्ध खेळत आहो. याची काही गॅरंटी नाही की आम्हीच सर्व मॅच जिंकू. तो म्हणाला, आता आमच्या ग्रूपमध्ये सर्वकाही फार एक्साइटिंग झाले आहे. चारी संघासाठी येणारे सामने क्वॉर्टर फायनल सारखे आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल. सर्व संघांकडे 2-2 प्वॉइंट्स आहे. हे खेळाडू आणि फॅन्ससाठी देखील फार एक्साइटिंग राहील.  

वेबदुनिया वर वाचा