IND vs PAK : ईशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमधील सलग चौथे अर्धशतक झळकावले

शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (20:03 IST)
IND vs PAK : आशिया चषकाच्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी (2 सप्टेंबर) भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 267 धावा कराव्या लागतील.
 
सध्या खेळल्या जात असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या इशान किशनने शानदार अर्धशतक (82) झळकावले आहे . हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे अर्धशतक आहे आणि पाकिस्तानविरुद्धचे पहिले अर्धशतक आहे.

उल्लेखनीय म्हणजे, त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे सलग चौथे अर्धशतक आहे.
या खेळीदरम्यान त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली.
 
प्रथम फलंदाजी करताना भारताने 48 धावांवर 3 विकेट गमावल्या असताना किशन फलंदाजीला आला.
त्याने कठीण काळात एक टोक पकडले आणि 54 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

त्याला दुसऱ्या टोकाकडून हार्दिकची चांगली साथ मिळाली आणि या जोडीने भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या 200 धावा पार केली.81 चेंडूत 82 धावांची खेळी करून तो बाद झाला.
किशनने सलग चौथे अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेत भाग घेतला होता आणि सलग 3 अर्धशतके केली होती.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 46 चेंडूत 52 धावा केल्या.
यानंतर दुसऱ्या वनडेत 55 चेंडूत 55 धावा केल्या. मालिकेतील तिसऱ्या वनडेत त्याने 77 धावांची खेळी केली
 
 
Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती