IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही. 24.1 षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला. भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि निर्धारित 50 षटकांत 356 धावा केल्या. विराट आणि राहुलने शतकी खेळी खेळली.
भारताने पाकिस्तानसमोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 122 आणि लोकेश राहुलने 111 धावा केल्या. दोन्ही फलंदाज शतके झळकावून नाबाद राहिले. या दोघांपूर्वी रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 58 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराट कोहलीने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 47 वे शतक आहे. यासोबतच त्याने कोलंबोच्या मैदानावर सलग चौथ्या डावात शतक झळकावले आहे. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने राहुलसोबत 200 धावांची भागीदारीही पूर्ण केली आणि भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. 48 षटकांनंतर भारताची धावसंख्या 330/2 आहे.विराट कोहलीने वनडेमध्ये 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण करणारा तो फलंदाज आहे.