भारताचा कर्णधार रोहित शर्मा बुधवारी (7 डिसेंबर) बांगलादेशविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करताना हिटमॅनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला तत्काळ मैदानाबाहेर काढण्यात आले. ढाका येथील रुग्णालयात त्यांचा एक्स-रे करण्यात आला. त्यानंतर रोहित स्टेडियमवर परतला. त्याच्या जागी केएल राहुल कर्णधार झाला. रोहित शर्मा फलंदाजीला उतरणार नाही असे वाटत होते पण दुखापतीनंतरही कठीण काळात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.
रोहित आला तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी 44 चेंडूत 65 धावा करायच्या होत्या. रोहितला 49व्या षटकात दोन जीवदान मिळाले. महमुदुल्लाहच्या दुसऱ्या चेंडूवर इबादत हुसेनने त्याचा सोपा झेल सोडला. यानंतर पाचव्या चेंडूवर अनामूल हकने झेल सोडला. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 7 विकेट गमावत 271 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाला 50 षटकांत नऊ गडी गमावून 266 धावाच करता आल्या. बांगलादेशने हा सामना पाच धावांनी जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.