भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा विरेंद्र सेहवाग, महिला संघाची कर्णधार मिताली राज यांच्यासह अनेक चाहत्यांनी मंथनाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवाग. मिताली राजसह अनेक क्रिडापटूंनी आणि स्मृतीच्या चाहत्यांनी स्मृतीला वाढदिवसाच्या शुणेच्छा दिल्या आहेत.
महिला क्रिकेट विश्वचषकामधील झालेल्या दुसऱ्या सामन्यात मंथना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात स्मृतीने नाबाद 106 धावा केल्या होत्या. स्मृती सर्वात कमी वयात भारताकडून विश्वचषकामध्ये शतक लगावणारी पहिली भारतीय ठरली आहे. या सामन्यावेळी स्मृतीचे वय 20 वर्ष आणि 346 दिवस होते. तिने आज 21 वर्ष पुर्ण केले. तसेच विश्व क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याच्या यादीत मांधना तिसऱ्या क्रमांकावर आहे.