प्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन

रविवार, 2 एप्रिल 2023 (10:19 IST)
प्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन झाले आहे. 88 वर्षांचे सलीम दुर्रानी कर्करोगाशी झुंज देत होते. अर्जुन पुरस्कार विजेते सलीम दुर्रानी यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये अखेरचा श्वास घेतला. अफगाणिस्तानात जन्मलेले सलीम दुर्रानी हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते.
 
1960 मध्ये हा पुरस्कार मिळालेल्या सलीम दुर्रानी यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी 29 कसोटी सामने खेळले. या सामन्यात त्याने एकूण 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 75 विकेट्स घेतल्या. सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमध्ये झाला. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे गेले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले होते.
 
1960 ते 1970 च्या दशकात सलीम दुर्राणी यांनी एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून आपली छाप पाडली. 1960 मध्ये त्यांनी मुंबईत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. प्रेक्षकांच्या सांगण्यावरून ते षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होते, असे म्हटले जाते. त्यांनी  शेवटचा कसोटी सामना 1973 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
 
क्रिकेटनंतर सलीम दुर्रानी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबीसोबत त्यांनी 'चरित्र' चित्रपटात काम केले.
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती