इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 चा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने पाच गडी बाद 164 धावा केल्या. पृथ्वी शॉने 48, शिखर धवन 43 आणि शिमरॉन हेटमायरने 29 धावा केल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने दोन तर युजवेंद्र चहल, डॅनियल क्रिश्चियन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बंगळुरूचा डाव सुरूच आहे.