CSK : माजी भारतीय यष्टीरक्षकाचा मोठा दावा,धोनीच्या जागी ऋषभ पंत CSK कर्णधारपदी!

रविवार, 3 डिसेंबर 2023 (20:54 IST)
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. चाहते स्पर्धेच्या 17 व्या हंगामाची वाट पाहत आहेत. त्याआधी दुबईत होणाऱ्या लिलावात रिक्त जागा भरण्याची संधी फ्रँचायझींना मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर असतील. 42 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने चेन्नईला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. पुढच्या वेळीही तो या स्पर्धेत दिसणार आहे.

त्याचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, असे मानले जात आहे. धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार कोण, याची चाहत्यांना आधीच चिंता लागली आहे.
 
धोनीच्या जागी कर्णधारपदासाठी दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऋषभ पंत योग्य उमेदवार असल्याचे भारताचा माजी यष्टिरक्षक दीप दासगुप्ता यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर पंतने अद्याप पुनरागमन केलेले नाही. तथापि, त्याने आपल्या सरावात मोठ्या प्रमाणात सुधारणा दर्शविली आहे आणि तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
 
“आयपीएल 2025 मध्ये त्यांना (चेन्नई सुपर किंग्ज) ऋषभ पंत मिळाल्यास आश्चर्य वाटू नका,” दीप दासगुप्ता X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाले. एमएस धोनी आणि ऋषभ पंत खूप जवळ आहेत. साहजिकच ऋषभला तो खूप आवडतो आणि धोनीलाही तो खूप आवडतो. दोघेही खूप वेळ एकत्र घालवतात. दोघांची विचारसरणी खूप सारखी आहे. तो नेहमी जिंकतो.
 
अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 साठी काही दिवसांसाठी कॅम्प लावला होता. यात ऋषभ पंतचा सहभाग नव्हता. फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली म्हणाले होते की, पंतच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत असून तो पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो संघाचे कर्णधारही असेल.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती