बुमराह वर्ल्ड कपमधून बाहेर

गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (16:47 IST)
टी-20 वर्ल्डकपमध्ये जाण्यापूर्वीच भारताला मोठा झटका लागला आहे. जसप्रीत बुमराहला पाठदुखीमुळे टी-20 वर्ल्डकपला मुकावे लागले आहे. या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी ही केवळ औपचारिकता आहे. पाठीच्या दुखापतीमुळे आणि हर्षलच्या बाजूच्या ताणामुळे बुमराह आशिया चषक 2022 ला मुकला.
 
अशा स्थितीत टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहच्या जागी कोण येणार हा प्रश्न बहुतांश क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घ्या कोणता गोलंदाज त्याची जागा घेईल.
 
1) दीपक चहर
दीपक चहरचे नाव टी-20 विश्वचषकातील अतिरिक्त खेळाडूंच्या यादीत होते. आशिया चषक स्पर्धेतील अतिरिक्त खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला होता. नुकताच तो आशिया चषकाचा शेवटचा सामना खेळला होता, यासोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही तो चांगली गोलंदाजी करताना दिसला होता. बुमराहच्या जागी दिपक तहरची निवड होण्याची शक्यता आहे.
 
२) मोहम्मद शमी-
दीपक चहरप्रमाणेच मोहम्मद शमीचाही टी-20 विश्वचषकातील अतिरिक्त खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. कोविडची लागण झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहभागी झाला नव्हता.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी शमीला कोरोनाची लागण झाली होती आणि व्हायरसपासून वेळेत बरा होऊ न शकल्यामुळे तो दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतूनही बाहेर पडला होता. निवड समितीने दोन्ही मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश केला आहे.
 
३) मोहम्मद सिराज-
मोहम्मद सिराजला टी-20 संघात क्वचितच संधी मिळाली आहे. त्याची मुख्यतः द्वितीय श्रेणी संघात निवड केली जाते. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याची कामगिरी चांगली होती. यासाठी त्यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती