द्रविडचे मानधन झाले दुप्पट

नवी दिल्ली- बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत अ आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झाली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आता वार्षिक मानधन 5 कोटी रूपये देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.
 
गेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार त्याला 2.5 कोटी रूपये मानधन दिले जात असे. हे कॉन्ट्रॅक्ट 31 मार्चला संपले होते. शुक्रवारी बीसीसीआयने द्रविडचा भारत अ‍ आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदाचा कालवधी पुढील दोन वर्षांसाठी वाढवलाय. दरम्यान, शुक्रवारीच द्रविडने आयपीएलमधील दिल्ली डेअर डेविल्सच्या मेंटर पदाचा राजीनामा दिला. द्रविडच्या नेतृत्वात युवा खेळाडूंनी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अं‍तिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

वेबदुनिया वर वाचा