युवा विश्वचषकात भारतीय मुलींची दमदार सलामी

रविवार, 15 जानेवारी 2023 (10:36 IST)
दक्षिण आफ्रिकेत सुरु झालेल्या पहिल्या मुलींच्या U19 स्पर्धेत भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. बेनोई इथे झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 166 धावांची मजल मारली. सिमोन लोरेन्सने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. मॅडिसन लँड्समनने 32 धावा करत तिला चांगली साथ दिली. भारताकडून शेफाली वर्माने 2 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीवीर श्वेता सेहरावतने 57 चेंडूत 20 चौकारांसह 92 धावांची वादळी खेळी केली. कर्णधार शेफाली वर्माने 16 चेंडूत 45 धावांच्या खेळीदरम्यान एका ओव्हरमध्ये 4,4,4,4,4,6 अशा 26 धावा चोपून काढल्या.
 
या दोघींच्या तडाखेबंद खेळाच्या बळावर भारतीय संघाने हा सामना 4 षटकं आणि 7 विकेट्स राखून जिंकला. श्वेताला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती