वेस्ट इंडीजचा मावळता कर्णधार ब्रायन लाराला आपल्या शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळताना दंडीत करण्यात आले.
वेस्य इंडीज व इंग्लंड विरूध्द खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील सुपर आठ च्या साखळी सामन्यता दोन्हीही संघांनी निर्धारित वेळेत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी सांगितेल की निर्धारित वेळेत इंग्लंडने दोन तर वेस्य इंडीजने एक षटक कमी टाकले. यामुळे दोन्ही संघांना दंडीत करण्यात आले.
नियमानुसार एक षटक कमी टाकल्याने सर्व खेळाडूंच्या मानधनातले पाच टक्के तर कर्णधारास दुप्पट दंडीत केले जाते. त्यानुसार इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉनला 20 टक्के तर लाराच्या मानधनावर 10 टक्के दंड करण्यात आला. यासामन्यात लारा फलंदाजीस येण्यास व बाद झाल्यावर जाताना खळ काही काळ थांबला होता.
37 वर्षीय लाराचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होता. तो धावबाद झाल्यावर परत जाताना इंग्लंडच्या खेळाडूंनी सरळ अोळीत उभे राहून त्याचा मानवंना दिली.