रहाणे हा अंबाती रायुडू याच्यापेक्षा कितीतरी चांगला फलंदाज असल्याचे अझरूद्दीन यांनी म्हटले आहे. याचबरोबर, धोनी हा पहिल्यासारखा फलंदाज राहिलेला नसल्याचे स्पष्ट मत अझरूद्दीन यांनी व्यक्त केले. धोनी हा पहिल्यासारखी कामगिरी करत नसेल तर निवड समितीने त्याच्याबद्दल विचार करावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.