नवी दिल्ली- न्यूझीलंडने तब्बल 13 वर्षांनी भारतीय संघाला भारतात पराभूत केले. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने या विजयाने 1-1 अशी बरोबरी राखली. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2003 रोजी किवींनी टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला भारतात एकदिवसीय सामन्यात हरवू शकली नव्हती.