ऑस्‍ट्रेलियाची आक्रमक सुरुवात, भारत सर्वबाद 161

वेबदुनिया

शुक्रवार, 13 जानेवारी 2012 (14:51 IST)
भारताचा डाव अवघ्‍या 161 धावांमध्‍ये गुंडाळल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली आहे. डेव्‍हीड वॉर्नरने भारतीय गोलंदाजांवर हल्‍ला चढविला. ज्‍या खेळपट्टीवर ऑस्‍टेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची 'वाका वाका' स्थिती केली, त्‍याच खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज पार निष्‍प्रभ झाले आहेत. वॉर्नर आणि कोवान जोडीने सुरुवातीच्‍या षटकांमध्‍ये सहा धावांच्‍या सरासरीने टीम इंडियाची धुलाई केली.

फलंदाजांसाठी कुख्‍यात असलेल्‍या 'वाका'च्‍या खेळपट्टीवर टीम इंडियाची 'वाका वाका' अशीच स्थिती झाली आहे. अवघ्‍या 161 धावांवर भारताचा डाव संपुष्‍टात आला आहे. दिग्‍गज फलंदाजांनी पुन्‍हा एकदा लाजीरवाणी कामगिरी केली.

वेबदुनिया वर वाचा