पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ऑलराऊंडर अब्दुल रज्जाक याला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये खेळण्यास हिरवा कंदील दिला आहे. रज्जाक याने पाक क्रिकेट मंडळाकडे या संबंधीची परवानगी मागितली होती. रज्जाक कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणार आहे.
पीसीबी अध्यक्ष इजाज भट यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रज्जाक याला आयपीएल सामन्यात खेळण्यास मंजुरी दिली.
संपूर्ण शक्तीनिशी खेळेन पीसीबीने आयपीएल सामन्यात खेळण्यास परवानगी दिल्याने रज्जाक याने आनंद व्यक्त केला आहे. आता आपण कोलकाता नाइट रायडर्सकडून संपूर्ण शक्तीनिशी संघाच्या विजयासाठी खेळणार असल्याचे त्याने म्हटले आहे.