आयपीएलची चौथी मालिका अमेरिकेत?

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2010 (11:21 IST)
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) चौथी ट्‍वेंटी-20 क्रिकेट मालिका अमेरिकेत होण्याची शक्यता आहे, असे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मुख्‍य संचलन अधिकारी अमृत माथूर म्हणाले. डेअरडेव्हिल्स संघाने इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पॅनासॉनिक कंपनीशी करार केला. त्याप्रसंगी माथूर बोलत होते.

आयपीएल आता ग्लोबल झाली असून चौथी मालिका अमेरिकेत झाल्यास आपण त्याचे स्वागत केले पाहिजे, असे माथूर म्हणाले. आयपीएलच्या संघांमध्ये परदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परदेशात आयपीएलला मोठा प्रतिसाद मिळेल व भारतीय तरूण खेळाडूंही खेळण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असे माथूर म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा