'युथट्यूब' लवकरचप्रेक्षकांच्या भेटीला

बुधवार, 30 जानेवारी 2019 (00:15 IST)
समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे राहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. याच परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारा 'मिरॅकल्स अ‍ॅकॅडमी' प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित 'युथट्यूब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवसेंदिवस महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे आणि त्या विरोधात महिलांनीच काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. महिला सबलीकरण हे केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता आचरणातही आणले गेले पाहिजे. जे हात लाटणं धरू शकतात तेच हात वेळ पडल्यास हातात शस्त्रही घेऊ शकतात, गरज असते ती केवळ स्वतःतील आंतरिक शक्तीला जागं करण्याची. स्वसंरक्षणासाठी स्वतःला कणखर करण्याची. हाच संदेश देत, स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारा 'युथट्यूब' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून तो 1 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती