सयाजी शिंदे आणि भालचंद्र कदम यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 92 नवोदित कलाकारांना यात काम करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. चित्रपटाचे लेखन समीर आणि मेहुल अघजा यांनी केले आहे. तसेच अर्जुन सोरटे सिनेमॅटोग्राफर, परेश कामदार संकलन, कुणाल लोलसूर साऊंड डिझाइन आणि मीलन देसाई वेशभूषेची जबाबदारी निभावत आहेत.