प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर, उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाश करता येईल, असा एक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस.पी.सेन यांनी संगीत दिले आहे. पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे.पी दत्ता यांनी ही गाणी गाली आहेत.
या चित्रपटात मोहनजोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभुलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालक लाकारदेखील अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.