आताच्या कलाकारांनी मेहनत वाढवायला हवी : अभिनेत्री स्मृती विश्वास

शुक्रवार, 23 मार्च 2018 (08:38 IST)
नाशिक शहरात आयोजित चार दिवसीय नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्म्रिती विश्वास यांना देण्यात आला तर प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री सुषमा शिरोमणी, मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मराठी सिनेमा जगभर पोहचवणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी किशोर कुमार आणि देवानंद यांच्यासोबत काम करताना कलावंतामध्ये एक ऋणानुबंध होता आज मात्र कलावंतांमध्ये वैचारिक दुरावा निर्माण झाला आहे. नव्या कलावंतांनी जास्त मेहनत करायला हवी असे प्रतिपादन यावेळी जीवन गौरव पुरस्कार विजेत्या स्मृती विश्वास यांनी केले आहे.यावेळी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर कुसाळकर, मृदुला कुसाळकर तसेच आजच्या दिवशी शेवटच्या सत्रात होणाऱ्या 'मराठी सिनेमाचे अच्छे दिन' या विषयावर चर्चासत्रासाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, टीव्ही जर्नालिस्ट सौमित्र पोटे, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक संदीप सावंत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मुंबई तरुण भारत संवादचे नरेंद्र कोठेकर, चित्रपट वितरक समीर दीक्षित, माजी आमदार कलावंत बबनराव घोलप, निफ महोत्सवाचे दिग्दर्शक मुकेश कणेरी, सद्गुरू मंगेश, राकेश नंदाजी आणि चित्रपट चाहते आदी उपस्थित होते.यावेळी शशी कपूर, लेख टंडन, ओम पुरी आणि श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.महोत्सवाच्या दहाव्या पर्वाचा शुभारंभ जागतिक जल दिनानिमित्त संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगने करण्यात आले. प्रारंभी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने निफ 2018 ची सुरुवात करण्यात आली.

यावेळी नदी वाहते या चित्रपटाचे दिग्दर्शक श्वास फेम संदीप सावंत यांच्यासह माजी मंत्री कलावंत बबनराव घोलप, गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी, जलयोद्धा राजेश पंडित, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे निशिकांत पगारे, महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या मेरी रॉकस्टारवाली जीन्स या चित्रपटाची बालकलाकार भानू तसेच नदी वाहते या फिल्मचे कलाकार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थित दर्शकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपल्या गावातून वाहणारी नदी सांभाळण्याचे काम प्रत्येकाला करावे लागणार असून त्यावरच शाश्वत विकास शक्य आहे. नद्या वाचवायच्या असतील तर काय करावे लागेल ते 'नदी वाहते' या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक संदीप सावंत यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोताच्या चळवळीसाठी ही फिल्म जिथे थेटर्स नाहीत अशा गावागावात दाखवण्याचा मानस असून यासाठी संपर्क करण्याचे आवाहन सावंत यांनी केले.

यावेळी सुपर मॉडेल सुशिल जांगेरा, 2013 च्या मिस इंडिया सिमरन आहुजा यांच्या उपस्थितीत हॉटेल बीएलव्हीडी येथे निफ ब्युटी काँटेस्ट अंतर्गत ग्रूमिंग सेशन्स घेण्यात आले.यावेळी प्रतिभा शर्मा दिग्दर्शित 'आमो अख्खा एक से' या हिंदी चित्रपटासह इंदिरा मेनन यांची स्वच्छ भारत, सुशील जांगिरा यांची मेरी रॉकस्टारवाली जीन्स या लघुपटांचे महोत्सवाअंतर्गत प्रदर्शन करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती