पुण्यातील संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. अनेक मराठी कलाकारांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत आपल्या पोस्टमधून कृतीचा निषेध नोंदवला. त्यामध्ये अभिनेता जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, अभिनेता- दिग्दर्शक सुबोध भावे यांचा समावेश आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याच्या फेसबूक वॉलवर संताप व्यक्त केला असून ' जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाही, तोपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही' अशी ठाम भूमिका मांडली आहे.