सिनेमावाले घेऊन येत आहेत ग्रामीण महाराष्ट्रासाठी नवीन मोबाइल डिजिटल मूवी थिएटर टेकनॉलॉजि "डिजिप्लेक्स "

सोमवार, 23 डिसेंबर 2019 (11:34 IST)
प्रसिद्ध चित्रपट एडिटर निलेश गावंड "सिनेमावाले"च्या माध्यमातून नवीन मोबाइल डिजिटल मूवी थिएटर टेकनॉलॉजि "डिजिप्लेक्स" महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील चित्रपट प्रेमींसाठी सादर करीत आहेत. "डिजिप्लेक्स" या पोर्टेबल मूवी थिएटरमध्ये उच्च स्तरीय डॉल्बी साऊंड टेकनॉलॉजि, एअर कंडिशन, मोठी स्क्रीन व इतर टेकनॉलॉजि असून तसेच मोठ्या हवेच्या घुमटात चित्रपट पाहण्याचा वेगळाच थरार जाणवेल. ग्रामीण भागातील प्रत्येकाला आपल्या गावात आपल्या दारी मल्टिप्लेक्स दर्जाचें चित्रपट पाहण्याचा अनुभव घेता येईल. या उद्देशाने "डिजिप्लेक्स" पोर्टेबल मूवी थिएटर संकल्पनेला योग्य दिशा देण्याचे काम चालू आहे.
प्रसिद्ध चित्रपट एडिटर निलेश गावंड यांनी "सिनेमावाले"च्या माध्यमातून नुकतेच एक मोठे पाऊल टाकले, सलमान खान अभिनित बहुचर्चित "दबंग ३" या सिनेमाचे सातारा मधील वडूथ आणि सांगली मधील तासगाव येथे चित्रपट रसिकांनी हाऊसफुल्ल प्रयोगांनी स्वागत केले. "सिनेमावाले"च्या या योजनेला ग्रामीण भागातील लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
 
"सिनेमावाले" दर शुक्रवारी नवनवीन चित्रपट घेऊन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोर्टेबल मूवी थिएटरच्या माध्यमातून चित्रपट प्रेमींना एक सुखद अनुभव देणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती