पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेय वाघ करणार 'दळण' चा प्रयोग

सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:32 IST)
पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 'दळण' ह्या नाटकाच्या खास प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात नाटक कंपनीच्या ह्या नाटकाद्वारे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाणार आहे. त्यासाठी, नाटक कंपनीची संपुर्ण टीम आणि नाटकातले सर्व कलाकार पुढे सरसावले असून, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, येथे  दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता 'दळण' चा खास प्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वाधिक संख्येने नाटक पहावयास येण्याचे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलं आहे. 
 
निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित अभय महाजन व रोहित निकम लिखित ह्या नाटकात अमेय वाघ, अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती