शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)

बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख चित्रपट बनवणार असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागराजनेच या चित्रपटाच्या घोषणेचा टीझर ट्विट केला आहे.
 
“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,” असं म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नागराज म्हणतो, “आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)”
 
या ट्विटमधून नागराजने शिवभक्तांना “शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा,” अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती