माझा होशील ना फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाह बंधनात अडकणार

Webdunia
रविवार, 24 डिसेंबर 2023 (11:54 IST)
social media
मृण्मयी देशपांडेची बहीण, माझा होशील ना फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच विवाह बंधनात अडकणारआहे. ती अभिनेता स्वानंद तेंडुलकरशी लग्न करत आहे. ते काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आज गौतमी-स्वानंद ने आपल्या प्रेमाची कबुली देत मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. 
 
गौतमी ने सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल झाले आहे. तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, "अखेर तो दिवस आला, माझ्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. हा दिवस माझ्या समरणात कायम राहील. लव्ह गौतमी" 
 
काही दिवसांपूर्वी  गौतमीची मोठी बहीण मृण्मयीने एक कौटुंबिक फोटो शेअर केला होता. त्यात गौतमी -स्वानंद यांच्या नात्याला चर्चा सुरु झाली असून या बाबत दोघांनी मौन बाळगले होते. आज गौतमीने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
 
गौतमी देशपांडे ही सध्या गालिब या नाटकामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. सारे तुझ्याचसाठी आणि माझा होशील ना या सिरियल्समध्ये देखील तिने काम केले आहे. तर स्वानंद तेंदुल हा अभिनेता आणि त्याचबरोबर डिजिटल क्रियेटर आहे. भाडीपा या डिजिटल मिडियाचा तो व्हॉइस प्रेसिडेंट आहे. एकाच इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि आता लवकरच दोघे लग्न करणार आहेत. ‘गेटिंग मॅरीड’ असे म्हणत गौतमीने या लग्नाची बातमी दिली आहे या पोस्टवर अनेक कलाकार व चाहते प्रेमाचा वर्षाव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. 
 
Edited By- Priya DIxit   

संबंधित माहिती

पुढील लेख