‘आमची मुंबई – द मुंबई अँथम गाणे यूट्युबवरून काढले

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (17:27 IST)
सचिन पिळगांवकर यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणं यूट्युबवरून काढून टाकण्यात आलं आहे. या गाण्यावरून सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करण्यात येत होतं. सचिन पिळगांवकर यांनीच हे गाणं म्हणलं असून या गाण्यात ते डान्स करतानाही दिसले होते. गाण्याचे शब्द, संगीत चित्रिकरण विनोदी असल्यामुळे हे गाणं ट्रोल झालं. 16 ऑगस्टला शेमारू बॉलीगोली या यूट्युब अकाऊंटवरून हे गाणं अपलोड करण्यात आलं होतं. या गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकील अन्सारी यांची आहे. तर व्हिडीओ आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविड यांनी केलं आहे. पाच मिनिटांच्या या व्हिडिओवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सचीच संख्या जास्त होती. शहराची वैशिष्ट्य या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये देण्यात आलं होतं.
 
दरम्यान सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फेसबूकवर सचिन पिळगांवकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. परंतु, विश्वास ठेवा, मी हा व्हिडियो एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसर्या कुठल्याही प्रलोभना मुळे केला नव्हता. आम्ही कलाकार मंडळी बर्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण कर...वगैरे...अस म्हटल आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती