भारतात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक मार्ग चोखाळत असतानाच देशातील मागास मानल्या जाणार्या आसाम राज्यातील एका छोट्या गावात गेली पाचशे वर्षे कॅशलेस व्यवहार केले जात आहेत हे ऐकून नवल वाटेल. पण हे सत्य असून गोवाहाटीपासून ३२ किमीवर असलेल्या एका छोट्या गावात दरवर्षी लागणार्या मेळ्यात तिवा जमातीचे लोक सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करतात व ही परंपरा १५ व्या शतकापासून सुरू असल्याचे समजते.