मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय संषर्घावर आधारित मराठी चित्रपट करण्याची इच्छा प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने जामनेर येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. झेंडा-2 हा चित्रपट गिरीश महाजन यांच्या जीवनप्रवासावर असेल असे देखील यावेळी अवधूत गुप्ते यांनी जाहीर केले.
त्यावेळी बोलतांना अवधूत गुप्ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन सारखे नेतृत्व लाभले भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश महाजन असून त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांना, तसेच विरोधाला सामना करावा लागणार असणार आणि गिरीश महाजन यांच्या याच राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट करण्याची माझी इच्छा असल्याचे यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी जाहीर केले आहे.
झेंडा हा चित्रपट 2010 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली होती. या चित्रपटाची निमिर्ती आणि दिग्दर्शन हे अवधूत गुप्ते यांनी केले होते. या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री आणि चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता झेंडा-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor