अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिनेत्रींच्या घरातुन साढेचार लाखाचे मौल्यवान घड्याळ चोरी गेल्याची तक्रार अभिनेत्रीने गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अभिनेत्रीने घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चोरी केल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहे.