'अजिंठा'ला सेन्सॉर सर्टिफिकेट नाही

वेबदुनिया

गुरूवार, 10 मे 2012 (11:45 IST)
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अजिंठा या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शित होण्याची शक्यता कमी झाली आहे.

या चित्रपटात बंजारा समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप समाजाचे नेते संजीव कुमार राठोड यांनी केला होता. ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट गिल आणि पारो यांची प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे.

वेबदुनिया वर वाचा