‘मनातल्या उन्हात’ सिनेमा ‘फेस्टिव्हल ऑफ ग्लोब’मध्ये

सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (12:26 IST)
नुकताच प्रदर्शित झालेला ‘मनातल्या उन्हात’हा चित्रपट मराठी प्रेक्षकांवर मोहिनी घालत असतानाच आता या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय  पातळीवर घेतली गेली आहे. 
 
आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची पहिली सिनेनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची अमेरिकेतील फेस्टिव्हल ऑफ ग्लोब या नामांकित चित्रपट महोत्सवात निवड करणत आली आहे. या महोत्सवासाठी अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, चीन, इराण यांसारख्या वेगवेगळ्या   देशांतील सुमारे 3000 चित्रपट स्पर्धेमध्ये होते. 7 ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सोहळा कॅलिफोर्निया येथे रंगणार असून या महोत्सवाला सुप्रसिध्द अभिनेता जॅकी चेन, अभिनेत्री शेरान स्टोन, मार्टिन शीन यच्यासह हॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा